महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे. "नांदेड" या नावाचा उगम "नंदी-तट" या शब्दामधून झालेला असून, "नंदी" म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि "तट" म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी सन १७०५ मध्ये या ठिकाणी आपला देह ठेवला.

 

      नांदेड हे सन १७२५ मध्ये हैद्राबाद संस्थानाचा हिस्सा झाले आणि १९४७ नंतर भारताच्या स्वातत्र्यानंतरही निजाम संस्थाने आपले स्वतंत्र अस्तित्व राखल्याने नांदेड हैद्राबाद संस्थानाचाच हिस्सा बनून राहीले. हैद्राबाद संस्थानाविरुद्ध केलेल्या भारत सरकारच्या पोलीस कारावाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.

................................................................. << नांदेड जिल्ह्याच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा >>

CM Scholarship

-------------------------------- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१६ -------------------------------

 

 

Income tax Dept