डीजीटल इंडीया वीक २०१५


मुख्य पान डीजीटल इंडीया वीक २०१५
 
× Click on images to see a larger view

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

डिजीटल इंडीया विक अंतर्गत दि.- 1 ते 7 जुलै दरम्यान घेतलेल्या विविध कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने नांदेड जिल्ह्यास उत्कृष्ट कामगीरीचा राज्यातून दुस-या क्रमांकाचे पारीतोषीक देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातून जालना प्रथम तर रायगड तृतीय पूरस्कार प्राप्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात डिजीटल इंडीया विक अंतर्गत डिजीटल लॉकर तयार करण्याचा नागरिकांसाठी कॅम्प, तसेच प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी डिजीटल इंडीयाचे कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा स्तरीय अनेक कार्यालयात जावून डिजीटल इंडीया अंतर्गत कार्यान्वीत विविध संगणक प्रणालींचे सादरीकरण करण्यांत आले. डिजीटल लॉकर, जीवन प्रमाण प्रणाली, आधार व्दारे बायोमॅट्रीक अटेंडन्स आणि अन्य प्रणालींचे प्रशिक्षण देण्यास तालुका स्तरीय मास्टर ट्रेनर्स तसेच महा-ई-सेवा केंद्रांचे तालुका स्तरीय प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यांत आले. DIT यांनी प्रदर्शीत केलेल्या डिजीटल इंडीयाच्या चित्रफीती गांवपातळीवर अनेक महा सेवा केंद्रा मार्फत नागरीकांना दाखविण्यांत आल्या. प्रत्येक इव्हेंटची माहीती ऑनलाईन पोर्टलवर भरण्यात आली होती. त्या माहिती नुसार राज्यनिहाय कामगीरी करण्यांची तपासणी करुन त्यातून प्रत्येक राज्यातून तीन जिल्ह्यांना पारीतोषीक देण्यात आले. त्यानुसार नांदेड जिल्ह्याला व्दितीय क्रमांकाचे पारीतोषीक प्राप्तत झाले. दि.28/12/2015 रोजी ई-गव्हर्नन्स दिना निमित्तत झालेल्याय कार्यक्रमात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री.रवी शंकर प्रसाद यांचे हस्ते स्टेन आँडीटोरीयम नवी दिल्ली येथे मा.जिल्हाधीकारी व डी.आय.ओ.एनआयसी यांना प्रदान करण्यांत आला आहे.

डीजीटल इंडीया प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दिनांक 1 जुलै 2015 रोजी मा. जिल्हाधिकारी यांचे बैठक कक्षात तसेच एनआयसी येथे


तालुकास्तरीय आणि निवडक गावपातळीवरील महा-ई-सेवा केंद्र चालकांना डीजीटल लॉकर आणि डीजीटल इंडीया प्रकल्पाबद्दल प्रशिक्षण दिनांक 1 जुलै 2015
स्थळ : एनआयसी, नांदेड. सहभागी प्रशिक्षणार्थी : 24


तालुकास्तरीय एमएसवॅन टीएचक्यु आणि डीएचक्यु यांना डीजीटल लॉकरबद्दल प्रशिक्षण दिनांक 2 जुलै 2015
स्थळ : एनआयसी, नांदेड. सहभागी प्रशिक्षणार्थी : 16


जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांचे डीजीटॅल लॉकर तयार करण्याच्या अभियानाचे उद्घाटन. मा. अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. निवासी उपजिल्हाधिकारी व मा. उपजिल्हाधिकारी स(निवडणूक) यांचे उपस्थितीत,
दिनांक 3 जुलै 2015 स्थळ एनआयसी, नांदेड


सर्व उपविभागीय अधिकारी आणि विभागप्रमुखांना डीजीटल इंडीया प्रकल्प, आधार एनेबल्ड बायोमॅट्रीक अटेंडन्स सीस्टीम आणि डीजीटल लॉकर प्रणालीचे सादरीकरण दिनांक 3 जुलै 2015
स्थळ : मा. जिल्हाधिकारी यांचे बैठक कक्ष.


जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना डीजीटल इंडीया प्रकल्प माहीती कार्यक्रम दिनांक 6 जुलै2015.
स्थळ: बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड


सर्वसामान्य नागरीकांसाठी डीजीटल लॉकर तयार करुन देण्याचे एक दिवसीय अभियान. उद्घाटन मा. जिल्हाधिकारी, नांदेड . प्रमुख उपस्थिती मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, नादेड आणि मा. निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड. दिनांक 6 जुलै 2015..
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय परीसर


जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यां साठी डीजीटल इंडीया माहिती आणि जीवनप्रमाण व डीजीटल लॉकर प्रणालीचे सादरीकरण. दिनांक 7 जुलै 2015.
स्थळ : एनआयसी, नांदेड. सहभागी प्रशिक्षणार्थी : 36


जिल्हा ग्रामिण विकास यंत्रण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना डीजीटल लॉकर आणि ई-डीस्ट्रीक्ट प्रकल्पांचे सादरीकरण दिनांक 7 जुलै 2015.
स्थळ : डीआरडीए प्रशिक्षण वर्ग. सहभागी प्रशिक्षणार्थी : 26


डीजीटल इंडीया सप्ताहा निमित्त सजवलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र
दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2015

 
Top
Feedback