कीटकनाशके खरेदीपूर्वी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी


मुख्यपृष्ठ कीटकनाशके खरेदीपूर्वी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी

कीटकनाशके खरेदीपूर्वी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी

 • शेतकरी बंधूनी सर्वप्रथम अनोळखी किंवा रस्त्यावर विनापरवाना कीटकनाशकाची खरेदी करू नये...

 • कीटकनाशके ही नेहमी परवाना धारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत...

 • शेतकरी बंधूनी कीटक व रोगाचा प्रकार लक्षात घेऊनच औषध खरेदी करावीत....

 • रस शोषण करणाऱ्या किडीसाठी अंतरप्रवाही कीटकनाशक तर पाने खाणाऱ्या अळ्यासाठी स्पर्शजन्य कीटकनाशके बुरशीजन्य रोगांसाठी बुरशीनाशके आणि जीवणूजन्य रोगासाठी जिवाणूनाशक औषध बाजारात उपलब्ध असतात....

 • पूर्णहंगामाकरिता आवश्यक असलेली कीटकनाशके मोठया प्रमाणात खरेदी करू नयेत....

 • कीटकनाशके खरेदीपुर्वी कीटकनाशकांचे बॅच क्रमांक केंद्रीय कीटकनाशक नोंदणी मंडळाचे नोंदणी क्रमांक उत्पादन तारीख अंतिम तारीख पाहूनच कीटकनाशके खरेदी करावीत....

 • कीटकनाशक वापराची अंतिम तारीख संपलेली अथवा अंतिम तारखेचे कीटकनाशके खरेदी करू नयेत...

 • औषध खरेदी केल्याची पावती विक्रेत्याकडून घ्यावी आणि त्या पावतीवर औषध कंपनीचे नाव, तयार केल्याची तारीख, समाप्तीची तारीख, विक्रेत्याची सही इत्यादी, नीट तपासावे नंतरच खरेदी करावे....

 • किटकनाशका बरोबर मिळालेले सूचना पत्र व्यवस्तीत वाचन करणे गरजेच आहे, यामुळे औषध कोणत्या किडीसाठी व रोगासाठी शिफारशीत आहे, कोणत्या पिकावर परिणामकारक आहे, औषध वापरायची मात्रा आणि बाधा झाल्यास करावयाची उपाययोजना या संदर्भात माहिती मिळते...

 • शेतकरी बंधूनी फवारणीच्या वेळी घ्यावयाची काळजी -

 • शेतकरी बंधूनी सर्वप्रथम फवारणीच्या पंपाची निवड आणि नोझल ची निवड पिकाचा प्रकार पाहूनच करावी....

 • औषधाचे द्रावण करण्या करिता पाणी स्वच्छ घ्यावे. गढूळ व क्षार युक्त पाण्याचा वापर करणे टाळावे....

 • शेतकरी बंधूनी प्रथम ड्रममध्ये आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन त्या मध्ये शिफारशीत औषधाची मात्रा टाकून हे मिश्रण काठीने एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे. त्यानंतर असे मिश्रण पंपात भरून फवारणी करीता वापरावे...

 • पंपातपूर्ण पाणी भरून त्यामध्ये मात्रा ओतून फवारणी करणे टाळावे...

 • फवारणीच्या वेळी नोझल स्वच्छ करताना तो तोंडावाटे स्वच्छ करू नये...

 • फवारणीच्या पंपाची टाकी भरतांना औषधें सांडणार नाहीत याची काळजी घ्यावी...

 • शिफारस केलेल्या तिव्रतेच्याच कीटकनाशकांचा वापर करावा अतितीव्रतेची कीटकनाशके वापरली म्हणजे किड रोग नियंत्रणात येते असे नाही उलट त्यामुळं पर्यावरण आणि पिकाच्या स्वस्थावर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामूळे फायदेशीर आणि उपयोगी किडीचा नाश होतो....

 • फवारणी करताना शरीराला अपायकारक ठरतील अशी कामे करू नयेत.खाणे,पिणे, धूम्रपान,इत्यादी फवारणीच्या कालावधीत अजिबात करू नयेत...

 • औषधाचा परिणाम मिळण्याकरिता पिकाच्या खालून आणि वरून एकसारखी फवारणी करावी....

 • फवारणी औषध पानावर व्यवस्तीथ चिकटण्याकरिता आणि परिणामकारकता वाढवण्याकरिता स्टिकरचा वापर करावा...

 • शेतकरी बंधूनी फवारणी हि शक्यतो सकाळी किंवा सूर्याची उष्णता कमी झाल्यावर दुपारनंतर करावी....

 • औषधाची फवारणी ही नेहमी वाऱ्याच्या दिशेबरोबर करावी....

 • फवारणी झाल्यानंतर फवारणी पंप स्वच्छ पाण्याने धुऊन सूर्यप्रकाशात सुकवण्यासाठी ठेवावा. रिकामे डब्बे, बाटली, पाकिटे, ही राहण्याच्या ठिकाणापासून दूर ठेवावीत किंवा खड्डा करून पुरून टाकावीत...

 • शेतकरी बंधूनी कीटकनाशके साठवतांना घ्यावयाची काळजी--

 • आपल्या राहत्या घरामध्ये कीटकनाशकाची साठवणूक करु नये. राहत्या घरापासून दूर कीटकनाशकाची साठवणूक करावी....

 • कीटकनाशके त्यांची मूळची पॅकिंग/वेस्टनात ठेवावीत, त्याच्या मूळ पॅकिंग मधून कीटकनाशके दुसऱ्या पॅकिंग मध्ये ओतून ठेऊ नयेत...

 • शेतकरी बंधूनी कीटकनाशके आणि तणनाशके यांची वेग वेगळी साठवणूक करावी....

 • ज्या ठिकाणी कीटकनाशके साठवुण ठेवलेली आहेत त्या ठिकाणी धोक्याच्या सूचना लिहून ठेवाव्यात व लहान मुले पोहचणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावेत....

 • कीटकनाशके साठवतांना त्यांचा वातावरणाशी सरळ संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी...

 • शेतकरी बंधूनी कीटकनाशके हाताळणी करतांना घ्यावयाची काळजी-

 • शेतकरी बंधूनी कीटकनाशके वाहतूक करतांना कीटकनाशके स्वतंत्र पिशवीत ठेवावीत....

 • बाजारहाट करतांना किटकनाशकासोबत अन्नपदार्थ बरोबर घेऊन जाऊ नयेत...

 • शेतकरी बंधूनी फवारणी नंतर घ्यावयाची सावधानता-

 • फवारणी झाल्यावर फवारणी करणाऱ्या व्यक्तीने साबणाने हातपाय स्वच्छ धुवावेत....

 • फवारणी झालेल्या शेतातील उत्पादित माल लगेच खाण्याकरिता उपयोगात आणू नये अथवा बाजारात विक्रीस पाठवू नये....

 • फवारणी द्रावण तयार करताना वापरलेली भांडे नदी,ओढे किंवा विहिरीत धुऊ नयेत...

 • कीटकनाशकाची विषबाधा झाल्यास तात्काळ डॉक्टरांना बोलवावे....

 •  
  Top