होट्टल सांस्‍कृतिक तथा पर्यटन महोत्‍सव- २०१८


मुख्यपृष्ठ होट्टल महोत्‍सव- २०१८
1 /12
Hottal
2 / 12
Hottal
3 / 12
Hottal
4 / 12
Hottal
5 / 12
Hottal
6 / 12
Hottal
7 / 12
Hottal
8 / 12
Hottal
9 / 12
Hottal
10 / 12
Hottal
11 / 12
Hottal
12 / 12
Hottal


चालुक्य कालीन होट्टल विषयी माहिती पुस्तिका #


होट्टल महोत्सवा विषयी :

नांदेड जिल्‍ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले व चालुक्‍यांची उपराजधानी म्‍हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले ग्राम म्‍हणून होट्टलची ख्‍याती आहे. होट्टल येथे सिध्‍देश्‍वराचे प्राचीन चालुक्‍य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत. प्राचिन शिल्‍प स्‍थापत्‍य कलेचा समृध्‍द वारसा जतन, संवर्धन करणे पर्यटन वाढीच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक आहे. त्‍याअनुषंगाने जनजागृती करणे पर्यटकांना तसेच महाराष्‍ट्रातील लोकांना या ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्‍थळांची माहिती देणे या दृष्‍टीने सांस्कृतिक तथा पर्यटन महोत्‍सव आयो‍जित होत आहे.

नियोजन

होट्टल सांस्कृतिक तथा पर्यटन महोत्सव ही मा. जिल्‍हाधिकारी श्री अरूण डोंगरे यांची संकल्‍पना असून त्‍यास मुर्त स्‍वरूप देण्‍यासाठी मा. आमदार श्री सुभाष साबणे यांनी पुढाकार घेतला असून त्‍यांचे सह मा. आमदार श्री अमरनाथ राजूरकर, मा. आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर व मा. आमदार श्री नागेश पाटील आष्‍टीकर यांनी प्रत्‍येकी रूपये पाच लक्ष प्रमाणे आपला स्‍थानिक विकास निधी दिला असून शासनाने या प्रस्‍तावास खास बाब म्‍हणून मान्‍यता प्रदान केली आहे.

हा महोत्‍सव आयोजित करण्‍यासाठी मा. जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली समिती गठीत केली असून मा. आमदार सुभाष साबणे ,मा. अपर जिल्‍हाधिकारी श्री संतोष पाटील, कार्यान्‍वयीन यंत्रणा कार्यकारी अभियंता श्री तोटावाड, जिल्‍हा नियोजन अधिकारी श्री राठोड, श्री सुरेश जोंधळे समन्‍वयक म्‍हणून अपर कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे हे काम पाहत आहेत. समितीच्‍या आजपावोतो तीन बैठका झाल्‍या असून त्‍यात कार्यक्रम निश्चिती करण्‍यात आली असून दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी होट्टल येथे प्रत्‍यक्ष भेट देवून कार्यक्रम स्‍थळ पाहणी करून, कार्यक्रमाच्‍या आयोजनाचे पुढील व्‍यवस्‍थापन निश्चित करण्‍यात आले . परिसरातील ग्रामस्‍थांशी संवाद साधण्‍यात आला.


होट्टल - ऐतिहासिक वारसा

:होट्टल येथे प्रत्‍यक्ष ऐतिहासिक पुरावा म्‍हणून १,००० वर्षा पूर्वीचे संस्‍कृत भाषेतील मराठी, कानडी लिपितील चार शिलालेख आहेत. ते वाचले गेले असून शारदाभुवन शिक्षण संस्‍थेने प्रकाशित केलेल्‍या “इन्सिक्रीप्‍शन ऑफ नांदेड डिस्ट्रिक्‍ट” या ग्रंथात त्‍यांचा समावेश आहे. चार प्राचीन वास्‍तूच्‍या शिवाय मुर्ती आविष्‍काराचा अप्रतिम संग्रह येथे पहायला मिळतो.

या मुर्ती आविष्‍कारात अप्रतिम नृत्‍य आविष्‍कार दर्शविणा-या नर्तकीच्‍या मनमोहक मुर्ती, प्राचीन काळात वापरलेल्‍या वाद्यांचा अप्रतिम आविष्‍कार इथे दिसतो. मृदंग, वीणा, इतर वाद्ये लक्षणीय आहेत. मुर्तीच्‍या रेखाटनातील तालबध्‍दता, आकार, गतीशिलता, कमनियता उल्‍लेखनिय आहे. वेषभूषा, केशभूषा, अलंकार मन वेधून घेतात. हा शिल्‍पाविष्‍कार मंदिरांच्‍या अंगोपांगावर घडलेला असला तरी त्‍यात धर्मश्रध्‍देबरोबरच धर्मापेक्षा जास्‍त कला आविष्‍कारांचा भाग अधिक लक्षणिय आहे.

होट्टल

नांदेड जिल्हयातील प्रेक्षणीय स्थळांची भटकंती करताना अगदी प्राचीनतम लेणीपासुन गुरुद्वारापर्यंत अप्रतिम ठिकाणे पाहता येतात.त्यातल्या काही अवशेषांचे स्वरुप उदध्व्स्त मंदिरांचे, पडक्या इमारतीचे आहे तर काहीचे स्वरुप मध्ययुगीन, आधुनिक बांधकामाचे आहे. अनेक धार्मिक स्थळेही आज प्रेक्षणीय बनली आहेत. प्राचीन आणि मध्य‍युगीन शिल्प स्थापत्य परंपरेत मात्र प्रत्येक धार्मिक क्षेत्र हे प्रेक्षणीय शिल्प स्थापत्य अविष्कार घडविणारे कलाकेंद्रच होते. अजिंठा, वेरुळ, कार्ले, भाजा, घारापुरी, औरंगाबाद, नाशिकच्या लेणी असो किंवा औंढा नागनाथ, अन्वा, धर्मापुरी, खिद्रापुर, निलंगा, उमरगा येथील देवळे असोत, धर्म अभिव्याप्ती बरोबरच तिथे प्रचंड कलाशक्तीेचे दर्शन घडते. धार्मिक क्षेत्र म्हणुन त्यांचे महत्व आज शिल्लक उरले नसले तरी अप्रतिम कला अविष्का्र घडविणारे प्रेक्षणीय स्थळ म्हणून आज महाराष्ट्रातील ही ठिकाणे जगप्रसिध्द आहेत. महाराष्ट्रातील काही प्राचीन मंदिरे धर्मक्षेत्र म्हणुन ख्यातकिर्त नाहीत किंबहुना तिथला धर्म संपलेला नाही आणि उरले आहेत ते उदध्वस्त अवशेष. अशाच उदध्वस्त पण तरीही प्रेक्षणीस स्थळांमध्ये अप्रतिम कलाकेंद्र व ऐतिहासिक प्रेक्षणीस स्थळ म्हणुन आवर्जुन पहावीत अशी आहेत होट्टलची मंदिरे.

होट्टल हे देगलुर तालुक्यातील प्रत्यक्ष देगलुर पासुन 12 कि.मी. अंतरावर असलेले गाव. तसे देशमुखी गढी असलेली तालेदार वस्ती. प्राचीन कालखंडातील म्हणजे आज पासुन हजार बाराशे वर्षापुर्वी चालुक्य नृपतीची चहलपहल असलेली पोटलनगरी. या पोट्टलनगरीत इ.स.1070, 1103 आणि 1120 या 50 वर्षातले तीन शिलालेख आहेत. इथल्या मंदिराना दिलेल्या दानाची नोंद या शिलालेखात आहे, याचा सरळ अर्थ असा आहे की, इ.स.1070 पुर्वीच ही देवळे बांधली गेली. आजपासुन बाराशे वर्षापुर्वीचे नांदेड परिसरातील शिल्पेकारांचे कलासामर्थ्य या होट्टल मधील अवशेषांनी जोपासले आहे. होट्टल मध्ये पहावयाची देवळे कुठल्या् देवाच्याा दर्शनासाठी नाही तर दगडातुन देव साकारणा-या माणसाच्याच कलासामर्थ्याची ओळख करुन घेण्यासाठी.

जिल्हाधिकारी यांचे आवाहन :

आपला प्राचिन वारसा जोपासण्‍यासाठी होट्टल सांस्‍कृतिक व पर्यटन महोत्‍सव रसिकासांठी पर्वणी आहे. १,००० वर्षापुर्वीच्‍या मंदिराच्‍या बाह्य भिंतीवरील व गर्भगृहातील हा कला अविष्‍कार पाहण्‍यासाठी, कला आस्‍वाद घेण्‍यासाठी ही लोकपरंपरा जोपासण्‍यासाठी आणि आपला समृध्‍द वारसा म्‍हणून त्‍याचे रक्षण करण्‍याची भावना लोक माणसात निर्माण करण्‍यासाठी व यामुळे निर्माण होणा-या पर्यटनातून स्‍थानिकांना रोजगाराची संधी निर्माण व्‍हावी म्‍हणून या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. कला, भक्‍ती व संस्‍कृतीचा संगम हा होट्टल महोत्‍सव असून यात सर्वांनी सहभागी व्‍हावे, सांस्‍कृतिक कार्यक्रमांचा आस्‍वाद घ्‍यावा. चालुक्‍यन शिल्‍पकला पहावी व आपली संस्‍कृती संवर्धित करावी असे मी आवाहन करतो.कार्यक्रम रूपरेषा

१७ फेब्रुवारी २०१८

कार्यक्रम सहभाग वेळ
तबला वादन भार्गव देशमुख, होट्टल सकाळी 9.30 ते 10.00
सुगम संगीत प्रसाद साडेकर व संघ औरंगाबाद सकाळी 10.00 ते 12.00
चर्चासत्र-विषय: चालुक्यन स्थापत्य कला डॉ.प्रभाकर देव, सुरेश जोंधळे, प्रा.एम.एस.महाके,प्रा. किरण देशमुख दुपारी 12.00 ते 2.00
ग्रंथ प्रकाशन:- चालुक्युन आर्ट हेरिटेज लेखक श्री सुरेश जोंधळे सायंकाळी 6.00 ते 7.00
चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी 7.00 ते 7.30
कथ्थक व लावणी जुगलबंदी आदिती भागवत (प्रख्यात नृत्यांगना व सिनेतारका) व संच पुणे सायंकाळी 7.30 ते 10.00
१८ फेब्रुवारी २०१८

कार्यक्रम सहभाग वेळ
शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिल पं.शौनक अभिषेकी सकाळी 9.00 ते 11.00
विदयार्थ्यासाठी बालगिते आनंदी विकास व संच दुपारी 12.00 ते 02.00
ग्रंथ प्रकाशन – होट्टल एक एैतिहासिक दर्शन डॉ.मारोती चव्हाण सायंकाळी 6.00 ते 6.05
पखवाज वादन व बासरी वादन जुगलबंदी उध्दव बापू आपेगांवकर व एैनौददीन वारसी सायंकाळी 6.05 ते 7.30
सुगम गायन विजय जोशी व संच रात्री 8.00 ते 10.30
 
 

MEDIA GALLARY


 
× Click on images to see a larger view
 
 
Top