photo
photo

हदगाव तालुक्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे !


तालुक्याची संक्षिप्त माहिती


photo

 

हदगांव तालुका हा शेतीप्रधान आहे. हदगांव तालुक्याची निर्मिती १ मे १९६० साली झाली आहे. हा तालुका समुद्र सपाटीपासुन ४१४ मीटर(१३५८ फुट) उंचीवर वसलेला असुन त्यां ची चतुःसीमा पुढीलप्रमाणे आहे. तालुक्यामच्या५ पुर्वेस हिमायतनगर व उमरखेड आहे. पश्चिमेस कळमनुरी व अर्धापुर असुन, दक्षिणेला भोकर तालुका आहे. उत्त.रेला उमरखेड व कळमनुरी तालुक्या ची सीमा आहे. हदगांव तालुका नांदेड जिल्हाेच्यास उत्तडर दिशेला वसलेला असुन, हा तालुका जिल्हा च्याे ठिकाणापासुन ६५ कि.मी. अंतरावर असुन, सोलापुर ते नागपुर राष्ट्री य महामार्गावर वसलेला आहे.

हदगांव तालुक्याेची लोकसंख्याा २,५९,४९९ एवढी आहे. यात स्त्रीर 48%, पुरुष ५२% आहे. हदगांव तालुक्याउचे साक्षरतेचे प्रमाण ६५ % आहे. यात साक्षरतेचे प्रमाण स्त्रीच ५५%, पुरुष ७३% एवढे आहे. हदगांव तालुक्यामध्ये आदिवासी समाजातील अंध जातीचे कुटुंब संख्या(गावे) मोठ्या प्रमाणात आहेत.

हदगांव तालुक्यामत हदगांव येथे नगरपालिका असुन ती नगरपालिका क दर्जाची आहे. हदगांव शहरामध्ये एक शासकिय ओधोगिक प्रशिक्षण संस्था आहे. तसेच एक शासकिय अध्यापक विद्यालय (डी एड कॉलेज) आहे. हदगांव तालुक्याअत मुख्यल पिके सोयाबीन, कापुस, ऊस आहेत. या तालुक्याात हडसणी येथे भाऊराव सहकारी साखर कारखाना आहे.

हदगांव तालुक्यााचे क्षेत्रफळ १,०४,०८६ हेक्टरर असुन बागायतीचे क्षेत्र ४,७६० हेक्टार एवढे आहे. हदगांव तालुक्याअत दोन नदया असुन एक पैनगंगा नदी,तर दुसरी उपनदी कयाधु असुन, या दोन्ही नदया पश्चिमेकडुन पुर्वेकडे वाहतात.

हदगांव तालुक्याेत दत्ततबर्डी, केदारनाथ येथे दोन ऐतिहासिक मंदीर आहेत व शिऊर येथे वैष्णव धर्मीय तीन लेण्याचा समुह आहे. तसेच दत्तेबर्डी देवस्थायन हे हदगांव शहरामध्येधच उंच टेकडयांवर वसलेले असुन, येथे दत्तांेचे मंदीर आहे. हे देवस्थांन दत्त‍बर्डी या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी दत्तर पोर्णिमेला भव्य यात्रा भरते. तसेच केदारनाथ येथे केदारेश्वाराचे (महादेव मंदीर) वसलेले असुन, यादवकालीन मंदीर आहे. त्याथ ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते. त्यामत मोठया संख्येलने भक्त् येतात